Rupali Patil- Thombare | ‘बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वत:च्या हिंमतीवर करा’ शरद पवारांवर आरोप करणाऱ्या रामदास कदमांवर रुपाली पाटील भडकल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना (Shivsena) फोडली, असा आरोप रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil- Thombare) यांनी रामदास कदम यांना खडे बोल सुनावले आहेत. शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार (Rebel MLA) त्यांच्यात काही झाले, की आलेच मा. शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला, अशा शब्दात रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil- Thombare) यांनी कदम यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

 

शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच मा. शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला. बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वत:च्या हिंमतीवर करा. कशाला तुमचे खापर मा. शरदजी पवार साहेबांवर फोडता. #सत्तापिपासू मुळे वाण नाही पण गुण लागला वाटतं तुम्हला, असं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil- Thombare) यांनी केलं आहे.

 

काय म्हणाले रामदास कदम?
रामदास कदम यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडली. अजित पवार यांना प्रशासकीय कामांचा प्रचंड अनुभव आहे. त्याच जोरावर अजित पवार यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. तर शरद पवार यांनीही संधी साधून अनेकदा शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

 

तुमचं समाधान झालं नाही का, अरविंद सावंत यांचा पलटवार
रामदास कदम यांनी शिवसेनेवर आरोप केल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी पलटवार केला आहे.
तुम्ही विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पडलात, लोकांनी तुम्हाला पराभूत केले.
त्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पुनर्वसनाचा आग्रह धरला.
या काळात रामदास कदम यांचं राष्ट्रवादी काँग्रेसशी साटलोटं सुरु होतं. रामदास कदम यांच्याकडून वेगळे प्रयत्न सुरु होते.
ही गोष्ट लक्षात येताच शिवसेनेने काळजी घेतली. त्यामुळेच खेडमधून पराभूत झालेल्या कदमांना मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर पाठवण्यात आले.
त्यावेळी शिवसैनिकाला डावलून रामदास कदम यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आमदार होऊनही,
तुमचं समाधान झालं नाही का, असा सवाल सावंत यांनी कदम यांना विचारला.

 

Web Title :- Rupali Patil- Thombare | ncp leader rupali patil thombare lashes out on ramdas kadam for blaming sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना केव्हा मिळेल 18 महिन्याचा DA एरियर? ही आहे मोठी अपडेट

 

Ramdas Kadam | रामदास कदमांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे आजारी, अजितदादांनी डाव साधला’

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)