धक्कादायक : एका रात्रीत पूलाची चोरी ? पाहा कुठे घडली ही घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरातील वस्तू किंवा इतर गोष्टी चोरी होण्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो, मात्र रशियात अनेक लोकांना धक्का बसेल अशी चोरी समोर आली आहे. चोरांनी चक्क पुलंचं चोरून नेला आहे. रशियामध्ये सध्या एका तुटलेल्या पुलाचे फोटो व्हायरल होत आहे. चोरांनी एका रात्रीत या पुलाची चोरी केली आहे.

या प्रकरणाची स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरु केली असून, या पुलाचा जवळपास ५० टक्के भाग चोरी झाला असून स्थनिकांना याची खबर देखील लागली नाही. उम्बा नदीच्या वर बनवण्यात आलेल्या ५६ टनाच्या एका ब्रिजचा मधला भाग काही दिवसांपासुन गायब आहे. यामुळे या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याआधी हा पूल नदीमध्ये कोसळल्याने गायब झाल्याचे सांगण्यात येत होते, मात्र एका नवीन अहवालामध्ये तो चोरी झाल्याचे समोर येत आहे. रिपोर्ट आल्यानंतर याचे अनेक फोटोज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होते. मात्र यासंबंधी अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. ५६ टन वजनाच्या या पुलाची निर्मिती अनेक वर्षांपूर्वी करण्यात आली होती.

दरम्यान, या पुलाची चोरी याच्या मालकानेच केली असावी अशी शंका पोलिसांनी उपस्थित केली आहे. पोलिसांच्या मते, पुलाचे सर्व लोखंड पाण्यात खेचण्यात आले. त्यानंतर याचे तुकडे तुकडे करण्यात आले. यानंतर हे चोर सर्व स्टील घेऊन गेले. पोलीस चोरांचा शोध घेत आहे. मात्र यामुळे आजच्या जमान्यात चोर किती आधुनिक पद्धतीने चोरी करतात याचे येऊ उत्तम उदाहरण म्हणून समोर आले आहे.