Ruturaj Gaikwad | ऋतुराजच्या पराक्रमी खेळीमुळे चाहत्यांनी केलं सायलीला कमेंट्स; म्हणाले – ‘आज तुमचे हे चांगले खेळले’

पोलीसनामा ऑनलाईन – Ruturaj Gaikwad | चेन्नई सुपर किंग्जनं (CSK) आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021) नुकताच प्रवेश केला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 4 विकेट्सनं पराभव करून चेन्नईनं आयपील मध्ये प्रवेश मिळवला आहे. सुप्रसिद्ध क्रिकेटर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचा या विजयात मोठा वाटा असून, ऋतुराज एक उत्तम बॅट्समन म्हणून ओळखला जातो.

मात्र काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री (Sayali Sanjiv) सायली संजीव हिचं नाव (Ruturaj Gaikwad) ऋतुराज गायकवाड याच्या सोबत जोडण्यात आलय. सायलीनं काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. व्हिडिओमध्ये सायली तिचे नवीन कानातले आपल्या चाहत्यांना दाखवत आहे. तर सायलीला बघून चाहत्यांना दुबईत खेळत असणारा ऋतुराज आठवतोय.

चेन्नईच्या विजयानंतर ‘आज तुमचे हे चांगले खेळले’ चक्क अशी कमेंट एका चाहत्यानं केली आहे.
तर व्हिडिओ मधील कानातलं पाहता एकानं, “ऋतुराजनं दिलं का?” असा सवाल कमेंट मधून विचारला आहे. तर ऋतुराच्या या पराक्रमी खेळीमुळे चाहत्यांनी तिच्या इन्टाग्रामच्या अकाऊंटवर कमेंटसचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, एका चाहत्यानं तर ‘ऋतु का राज’ असे म्हटलं आहे. तर एकानं चक्क “सायली दीदीला ऋतुराज आवडत असेल खूप, चांगला खेळलास भावा तू; एकदा सायली दीदीला भेटून घे. मन शांत होईल सायली दीदीचं.” अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, ऋतुराज हा चेन्नई या टीमकडून खेळला जाणारा खेळाडू असून, त्यानं सर्वाधिक धावा काढणार्‍या खेळाडूंच्या यादीत दुसरा क्रमांक पटकवला आहे.
काल दुबईमध्ये झालेल्या सामन्यामध्ये त्यानं 50 बॉलमध्ये 70 धावा केल्या आहे.
कालच्या खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईनं दिल्लीचा पराभव करून तब्बल 9व्या वेळी अंतिम फेरीत विक्रमी प्रवेश मिळवला आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | बारामतीमध्ये 34 वर्षीय ऑडिट सुपरवायझरची आत्महत्या

Maharashtra Band | आघाडीचा बंद हा ‘ढोंगीपणाचा कळस’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (व्हिडिओ)

Nusrat Jahan Marriage | …अन् नुसरत जहॉंनं दिली प्रेमाची कबूली ! फोटो शेअर करत म्हणाली, झालं दुसरं लग्न..

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ruturaj Gaikwad | ipl202 fans are happy with rituraj performance in capitals vs chennai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update