‘या’ अधिकाऱ्याचा होणार मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – थोड्याच वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार आहे. या मंत्र्यांमध्ये भाजप आणि एनडीएच्या मित्र पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांसोबत एका अधिकाऱ्याला देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. ते अधिकारी आहेत माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर.

कोण आहेत एस. जयशंकर ?
१९७७ चे आयएफएस असलेले एस जयशंकर २०१५ ते २०१९ पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव राहिले आहेत. जयशंकर यांनी त्यांच्या कार्यकाळात अमेरिका, चीन, झेक रिपब्लिक या देशांचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. सेवानिवृत्तीनंतर जयशंकर यांनी टाटा संस में ग्लोबल कॉर्पोरेट अफेयर्स चे अध्यक्ष म्हणून नोकरी चालू केली होती. ते श्रीलंकेमध्ये भारतीय शांती सेनेचे राजकीय सल्लागार देखील राहिले आहेत.

जयशंकर यांची पहिली पोस्टींग १९७९ ते १९८१ पर्यंत रशियामध्ये भारताच्या दूतावासात झाली होती. १९९० मध्ये बुडपोस्ट मध्ये कॉमर्शियल काउंसलर ची पोस्टिंग दिली होती. यानंतर ते भारतात परतले आणि तीन वर्षापर्यंत युरोपासंबंधी प्रकरण पाहिले.

एस. जयशंकर यांच्या या अनुभवाचा फायदा मोदी सरकारला होण्यासाठी त्यांचा समावेश सरकारमध्ये केला जात आहे. दरम्यान, मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेले अर्थमंत्री अरुण जेटली तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आरोग्याच्या कारणास्तव या सरकारमध्ये सामील होणार नाहीत.