Sachin Ahir  | भाजपाच्या कार्यक्रमात मराठी कलाकाराचा अपमान, टायगरच्या सत्कारासाठी राहुल देशपांडेंचे गायन मध्येच थांबवले (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीनिमित्त भाजपाकडून (BJP Diwali Program) वरळीत मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचे गायन सुरू असताना बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Bollywood Actor Tiger Shroff) आल्याने त्याच्या सत्कारासाठी देशपांडे यांचे गायन थांबवण्यात आले. यामुळे देशपांडे देखील वैतागले होते. भाजपाच्या या कार्यक्रमात मराठी कलाकाराचा (Marathi Artist) अपमान झाल्याने सर्वत्र टीकेचा सूर उमटत आहे. शिवसेना (Shivsena) नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी देखील या प्रसंगाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून देशपांडे यांचा अपमान झाल्याचे म्हटले आहे. मात्र भाजपाने सचिन अहिर (Sachin Ahir) यांचे आरोप फेटाळून लावला आहे.

 

वरळीच्या जांबोरी मैदानात (Jamboree Ground Worli) आयोजित या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे गाणे सादर करत असताना टायगर श्रॉफ कार्यक्रमस्थळी आल्याने त्याचा सत्कार करण्यासाठी राहुल देशपांडे यांना काही वेळासाठी गायन थांबवण्यास सांगण्यात आले. मंचावर यावेळी भाजपा आमदार मिहीर कोटेचा (BJP MLA Mihir Kotecha) उपस्थित होते. यावेळी देशपांडे यांनी आपला त्रागा मराठीतून व्यक्त केला पण भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांना ते समजले नाही. यामुळे त्यांनी इंग्रजीतून देशपांडे यांना थांबण्याची विनंती केली.

याबाबत एका मराठी वृत्तवाहिनी बोलताना सचिन अहिर (Sachin Ahir) म्हणाले, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, दहीहंडी तसेच इतर सणांच्या माध्यमातून हे मराठी माणसांची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या व्हिडीओमुळे यांची खर्‍या अर्थाने मराठी माणूस आणि कलाकरांबद्दल अस्मिता काय आहे हे दिसत आहे. निवडणूका आल्यानंतर अशा गोष्टी करायच्या, पण नंतर कोणत्याच कार्यक्रमांचे आयोजन केले जात नाही.

 

सचिन अहिर म्हणाले, ज्येष्ठ कलाकार गाणे गात असताना दोन वेळा अडवणूक झाल्याने त्यांनीच मला तरी बोलू द्या किंवा तुमचे कार्यक्रम करा असे सांगितले.
टायगर श्रॉफही मुंबईतच मोठा झाला. त्यामुळे त्याला विरोध असण्याचे कारण नाही.
पण तुम्ही खर्‍या अस्मितेच्या गोष्टी करता आणि अशाप्रकारे कलाकारांचे अपमान करता.
भाजपाने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी मागणी अहिर यांनी केली.

 

दरम्यान, सचिन अहिर यांच्या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले
की, शिवसेनेने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जावे आणि नाव बदलून घ्यावे.
आपले नाव रडकी सेना ठेवावे. काही झाले तरी रडत असतात.
स्वत: काही करायचे नाही, मराठी माणसाशी नाळ नाही, कार्यक्रम करायचे नाहीत.
अपयश लपवण्यासाठी रडायचे हाच धंदा सुरु केला आहे. सचिन आहेर त्यांचे नेते असून तेच काम करत आहेत.

 

शेलार पुढे म्हणाले, कोणताही अपमान झालेला नाही. उलट मराठी माणसाच्या मराठमोळ्या दिपोत्सवात हिंदी कलाकार येत आहेत
ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. भाजपाकडून मराठी माणसाचा सन्मान होतोय याचीच सचिन अहिर यांना खंत आहे.

 

Web Title :- Sachin Ahir  | thackeray faction mla sachin ahir alleged rahul deshpande disrespected by bjp for tiger shroff in diwali programme

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Hemoglobin Deficiency | हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरात वाढतात अनेक समस्या, ‘या’ आहाराने वाढवा पातळी

Pune News | विधायक कार्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र यावे; रत्नाकर गायकवाड यांचे मत

Ritesh Deshmukh | 16 जणांना डावलून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला दिला भूखंड, भाजपाने केले गंभीर आरोप