Sachin Vaze Bail Application Rejected | सचिन वाझेला पुन्हा झटका ! PMLA कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sachin Vaze Bail Application Rejected | मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये (Money Laundering Case) अडचणीत सापडलेले बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाकडून (Special PMLA Court) शुक्रवारी फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सचिना वाझेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. (Sachin Vaze Bail Application Rejected)

 

सचिन वाझे अँटिलिया विस्फोटके (Antilia Explosives) आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) अटकेत आहेत. मागील काही दिवसात सचिन वाझे यांनी हृदयशस्त्रक्रिया झाल्याने तुरुंगात पाठवण्याऐवजी घरातच नजरकैदेत ठेवावे, अशी विनंती केली होती. परंतु, सचिन वाझेची विनंती विशेष एनआयए न्यायालयाने (Special NIA Court) मागेच नाकारली होती. आता विशेष पीएमएलए न्यायालयाकडून त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती.
ती कार 18 फेब्रुवारी रोजी मुलुंड-ऐरोली पुलावरून चोरली होती. या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी कळवा खाडीत आढळला होता.
त्यानंतर या प्रकरणाचा तपास 8 मार्च रोजी एनआयएने ताब्यात घेतला होता.
एनआयएने तपासातील माहितीच्या आधारे सचिन वाझे यांना 13 मार्च रोजी अटक (Arrested) केली होती.
दरम्यान, सचिन वाझेने जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने पुन्हा फेटाळला आहे.

 

Web Title :- Sachin Vaze Bail Application Rejected | ex mumbai crime branch police officer sachin wazes bail application rejected by special pmla court mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parbhani Crime | अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, 1.30 कोटींचा मुद्देमाल जप्त

 

LIC Share Price | LIC च्या शेअरमध्ये 13% घसरण ! आता काय करावे गुंतवणुकदारांनी…होल्ड करावे की विकून बाहेर पडणे चांगले?

 

MNS on Thackeray Government | मनसेचा ठाकरे सरकारला जोरदार इशारा; म्हणाले – ‘आज तुमचे दिवस…उद्या आमचे येतील’