Sachin Vaze | सचिन वाझेंचा जामीन अर्ज 18 नोव्हेंबरला निकालासाठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पैशांची अफरातफर प्रकरणात अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची जामीनावरील चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या जामीन अर्जावर येत्या 18 नोव्हेंबरला सुनावणी पार पडणार आहे. स्कतवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) मात्र त्यांच्या जामीनाला विरोध केला आहे. त्यांना जामीन दिल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करु शकतात, असे ईडीने म्हंटले आहे.

 

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयात सचिन वाझे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) यांना स्कतवसुली संचलनालयाने (ED) अटक केली होती. त्यानंतर वाझे यांना अटक करण्यात आली. देशमुख प्रकरणाच्या तपासावेळी मुंबईतील बार आणि परमिट रुम मालकांकडून दर महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचे काम सचिन वाझेला दिले होते, असे त्यांनी कबूल केले होते. त्यामुळे देशमुख प्रकरणात वाझे महत्वाचे साक्षीदार असल्याने त्यांना मुक्त केल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करतील, असा दावा ईडीने न्यायालयात केला.
त्यावर आता न्यायालय काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) या प्रकरणात मासा (माफीचा साक्षीदार) आहे.
त्यांनी अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh)
यांच्या विरोधात पुरावे आणि माहिती देण्याचे कबूल केले आहे.

 

Web Title :- Sachin Vaze | sachin waze money laundering case sachin vaze s bail hearing is over verdict will be on november 18

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Naresh Mhaske | श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी शिंदे गटाकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

Jitendra Awhad | जामीन मिळताच आव्हाडांची प्रतिक्रिया; “…मला संपवण्यासाठी ठरवून”