Sadabhau Khot | ‘…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावायला कमी करणार नाही’; माजी मंत्र्याचा परिवहन मंत्र्यांना इशारा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sadabhau Khot | एसटी कामगारांच्या संपाला जवळजवळ सहा महिन्यांचा कालावधी लोटला असावा. मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. राज्य सरकार एसटी महामंडळात (MSRTC) नोकरभरती करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे नेते सरकारमधील मंत्र्यांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी थेट परिवहन मंत्र्यांनाच इशारा दिला आहे.

 

एसटी कामगारांचा संप मोडायचा ही सरकारची भावना आहे. या सरकारने खाजगीकरणाचा (Privatization) घाट घातला असून खाजगीकरण करून हे हप्ते वसुल करणार असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कामगारांच्या प्रश्नावर संवेदनशील मार्गाने तोडगा निघत नसेल तर अनिल परब (Anil Parab) यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलनाला बसू. एसटीमध्ये काम करणारी माणसं ही साधी आणि खेड्यापाड्यातली आहेत. जर तुम्ही आमच्या माणसांना बांबू लावणार असताल तर आम्हीही त्यांना बाबू लावायला कमी करणार नाही, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले.

 

एसटी (ST) महाराष्ट्राचं वैभव आहे, असं म्हणता खोत यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही निशाणा साधला.
सुप्रिया सुळे आणि पवारसाहेबांना युक्रेनमधील (Ukraine) विद्यार्थ्यांची चिंता आहे.
मग ते महाराष्ट्राच्या (Maharashtra) विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एसटीवर का बोलत नाहीत ?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवर अनिल परब काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एसटीवरून भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही सरकारवर निशाणा साधला होता.

 

Web Title :- Sadabhau Khot | ex minister sadabhau khot attacked transport minister anil parab over msrtc stike st employee agitation msrtc

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा