Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray | ‘अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री मास्क काढून चंद्रासारखा मुखडा दाखवणार’ – सदाभाऊ खोत

गेवराई : पोलीसनामा ऑनलाइन – Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray | गेल्या अडीच वर्षापासून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि विरोधकात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसत आहे. अधिकतर भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी ते हिंगणगाव येथे बोलत होते.

हिंगणगाव (Hingangaon) येथील 32 वर्षीय शेतकरी नामदेव जाधव (Namdev Jadhav) याने कारखाना गाळपास ऊस नेत नसल्याने नैराश्यातून तीन दिवसांपूर्वी एक एकर उसाला आग लावून आत्महत्या (Suicide) केली. त्यांच्या कुटुंबाची सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सदाभाऊ खोत म्हणाले की, ”अडीच वर्षानंतर आज मुख्यमंत्री मास्क काढून आपला चंद्रासारखा मुखडा दाखवणार आहेत. मात्र, त्यांना लोककल्याणकारी राज्य निर्माण करता आलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे.” अशी टीका त्यांनी केली. (Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray)

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, ”महाविकास आघाडी सरकार अकार्यक्षम असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. त्यांना शेतकऱ्याचे काही देणे घेणे राहिले नाही. साखर कारखानदार आता मक्तेदार असल्यासारखे वागू लागले आहेत. मराठवाड्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासाठी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच हिंगणगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Web Title : Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray | after two and a half years the chief minister will take off his mask and show his face like the moon sadabhau khot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन