Manisha Kaynde | शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदे यांच्यावर मोठी जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Manisha Kaynde | विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kaynde) यांनी रविवारी शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी मोठा धक्का बसला आहे. रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनिषा कायंदे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) उपस्थित होते.

 

मनिषा कायंदे (Manisha Kaynde) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. मनिषा कायंदे यांची शिवसेना सचिव (Secretary) आणि पक्ष प्रवक्तेपदी (Party Spokesperson) नियुक्ती करण्यात आली आहे. कायंदे यांच्यासह चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल (Vijay Tandel) आणि त्यांच्या पत्नीनेदेखील शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.

 

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे रविवारी वरळीत शिबीर पार पडले. परंतु, त्यापूर्वीच आमदार मनिषा कायंदे ह्या नॉट रिचेबल (Not Reachable) झाल्या होत्या. त्या शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चाही माध्यमांमध्ये पसरली होती. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात रविवारी रात्री उशिरा प्रवेश केला. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

 

मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशाची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटवरून दिली.
या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, मनिषा कायंदे या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Uddhav Balasaheb Thackeray Group)
आमदार यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत
त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून
पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कांयदे यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

 

 

Web Title :  Manisha Kaynde | manisha kayande joins shivsena shinde group cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा