साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पुन्हा मागितली माफी : करून घेणार स्वतःला ‘हि’ शिक्षा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – नथुराम गोडसे हे देशभक्त होते असे वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे. नथुराम गोडसे देशभक्तच होता व देशभक्तच राहील. जे गोडसेला दहशतवादी संबोधतात, त्यांनी स्वतःचा विचार करावा, असे वक्त्यव्य करून साध्वी प्रज्ञा यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर भाजपने देखील साध्वी यांना या प्रकरणात माफी मागायला लावली होती. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मी त्यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही असे म्हटले होते. याप्रकरणी सर्वत्र गदारोळ झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी माफीदेखील मागितली होती. मात्र निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्यांनी हा विषय उकरून काढला आहे.

आता साध्वी यांनी देखील यावर ट्विट करत म्हटले आहे कि, पुन्हा माफी मागत २१ तास मौन व्रत करणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, “मतदान संपल्यानंतर आता चिंतन सुरू आहे. निवडणुकीदरम्यान जर माझ्या शब्दांनी देशभक्तांना दुःख पोहोचले असेल तर मी माफी मागते. आणि त्याचे प्रायश्चित म्हणून २१ तास मौन पाळणार आहे.”साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरे यांच्यावर देखील टीका करताना म्हटले होते कि, हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला.

दरम्यान, या सगळ्या गोष्टीचा साध्वीला किती फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.