Saffron Tea Benefits | रोज रात्री केसरयुक्त चहा प्यायल्याने शरीराला होतील हे ६ जबरदस्त फायदे, जाणून घ्या रेसिपी

नवी दिल्ली : Saffron Tea Benefits | केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक आहे. ते औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. केशरमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. रोज रात्री केशर चहा प्यायल्याने (Saffron Tea Benefits) आरोग्याला प्रचंड फायदे होतात. रात्री केशर चहा पिण्याचे फायदे जाणून घेऊया –

रात्री केशर चहा पिण्याचे फायदे – Saffron Tea Benefits at Night

१. चांगली झोप येईल
केशरमध्ये सफ्रेनल कंपाउंड (Sufranal Compound) असते, जे शरीराला शांत करते. केशर चहा प्यायल्याने मन शांत होते आणि चांगली झोप लागते.

२. ब्लड शुगर करा कंट्रोल
रात्री केशर चहा प्यायल्याने ब्लड शुगर कंट्रोल (Blood Sugar) राहते. पण ब्लड शुगर लेव्हल जास्त असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करा.

३. पचनाच्या समस्या दूर करा
गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या पचनाच्या समस्या असतील तर केशर चहा पिऊ शकता. रात्री केशर चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. सकाळी पोट सहज साफ होते.

४. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध
केशरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने केशर चहा रात्री प्यायला तर शरीराचे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळता येते. ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो.

५. तणाव दूर करा
रोज रात्री केशर चहा प्यायल्यास ताण कमी होतो. केशर चहा प्यायल्याने चिंता आणि तणावासारख्या मानसिक समस्यांपासून आराम मिळतो.

६. पीरियडच्या वेदना करा कमी
मासिक पाळीत जास्त वेदना होत असल्यास रात्री केशर चहा पिऊ शकता, समस्या कमी होतील.

केशरचा चहा कसा बनवावा – How To Make Saffron Tea

  • यासाठी दोन कप पाणी घ्या.
  • त्यात केशरच्या काड्या टाका.
  • त्यात पुदिन्याची पाने आणि आले घाला.
  • ते चांगले उकळून गाळून घ्या.
  • नंतर लिंबू आणि मध घाला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | पोलीस प्रोत्साहन भत्त्याच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी

ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर अँन्टी करप्शनकडून FIR