केवळ तत्त्वांसाठी ‘या’ अभिनेत्रीने सोडले २ कोटींच्या जाहिरातीवर पाणी

मुंबई : वृत्तसंस्था – रंग उजळण्यासाठी आजकाल सर्रास फेअरनेस क्रिम वापरल्या जातात. फेअरनेस क्रिमचा खप वाढावा यासाठी विविध जाहिराती बनवल्या जातात. या जाहिरातींना प्रमोट करण्यासाठी सेलेब्रेटींना कोट्यवधी रुपये दिले जातात. हे सेलिब्रिटी स्वत: या फेअरनेस क्रिमचा वापर करत नाहीत. केवळ पैशांसाठी या क्रिमच्या जाहिराती करतात. मात्र या गोष्टीला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री साई पल्लवी अपवाद ठरली आहे.

एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी साई पल्लवीला २ कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र मी स्वत: सौंदर्य प्रसाधनांना पाठीशी घालत नाही. तुम्ही स्वत:विषयी, त्वचेच्या रंगाविषयी आत्मविश्वास बाळगलाच पाहिजे , असे म्हणत साई पल्लवीने ही ऑफर नाकारली. चित्रपटांतही कमीत कमी मेकअप करणारी अभिनेत्री म्हणून साई पल्लवी ओळखली जाते. आता तत्त्वांसाठी जगणारी अभिनेत्री अशी तिची आणखी एक ओळख निर्माण झाली आहे.

२०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून साई पल्लवीने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर ‘अथिरन’, ‘मारी २’हे चित्रपट विशेष गाजले. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे.

मात्र फेअरनेस क्रिमची जाहिरात नाकारणारी साई पल्लवी ही पहिलीच अभिनेत्री नाही. यापूर्वी सुशांत सिंग राजपूतने फेअरनेस क्रिमची जाहिरात नाकारली होती. बॉलिवूड कलाकारांच्या फेअरनेस जाहिराती करण्यावर अभिनेता अक्षय देओलने आक्षेप घेतला होता. त्याला प्रतिसाद देत फेअरनेस क्रिमसारख्या जाहिराती केल्याने आणि त्यांना प्रमोट केल्याने समाजात चुकीचा संदेश पसरतो. कोणत्याही वस्तूला घेवून समाजात चुकीचे संदेश न पसरवणं ही प्रत्येक अभिनेत्याची जबाबदारी आहे.’ असे म्हणत सुशांत सिंग राजपूतने १५ कोटींची ऑफर नाकारली होती.

You might also like