‘ट्रोल’ झाल्यानंतर ‘सैफ-करीना’नं दिलं PM Cares Fund आणि ‘मुख्यमंत्री मदतनिधी’त ‘डोनेशन’ ! ट्रोलर्सना ‘सडेतोड’ उत्तर


पोलीसनामा ऑनलाईन :
बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात योगदान देण्यासाठी काही संस्थांना डोनेशन दिलं होतं. त्यांनी पीएम केअर्स फंडात डोनेशन न दिल्यानं ते सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. यानंतर आता अशी माहिती समोर आली आहे की, त्यांनी पीएम केअर्स फंडात आपलं योगदान दिलं आहे. नुकतीच करीना कपूरनं सोशलवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

करीनानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिलं आहे की, “आम्ही पीएम केअर्स फंड आणि मुख्यमंत्री मदतनिधीत आमचं योगदान दिलं आहे. अशा स्थितीत मदतीचा दिलेला एकेक हात आणि एकेक पैसा महत्त्वाचा असतो. जितकी शक्य आहे तितकी मदत करा. करीना, सैफ आणि तैमूर.” या पोस्टद्वारे करीनानं चाहत्यांनाही योगदान देण्यासाठी अपील केलं आहे.

https://www.instagram.com/p/B6vjjFRFQgw/

करीना कपूरनं मंगळवारीच या विषयीची माहिती दिली आहे की, तिनं आणि पती सैफ अली खान यांनी देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या लढाईसाठी डोनेशन देऊन आपलं योगदान दिलं आहे. करीना आणि सैफनं युनिसेफ, GIVE INDIA आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज(IAHV) अशा संस्थांना COVID-19 सोबत निपटण्यासाठी डोनेशन दिलं आहे. परंतु सोशल मीडिया मात्र त्यांच्या या निर्णयानं जास्त खुश नव्हतं. काही लोक यामुळं नाराज झाले होते की, तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी केअर्स फंडात डोनेट करण्याऐवजी ग्लोबल एजन्सीजला डोनेशन दिलं.

https://www.instagram.com/p/B6KcqtxBAGB/

या सगळ्यानंतर आता पीएम केअर्स फंडासोबतच मुख्यमंत्री मदतनिधीतही करीना सैफनं आपलं योगदान देऊन ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाबद्दल बोलायचं झालं तर देशात अद्याप यामुळं 50 लोकांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 1965 लोकांना याची लागण झाली आहे.