Saigavhan Gram Panchayat | रोजगार सेवकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध ठिय्या आंदोलन

कन्नड/औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Saigavhan Gram Panchayat | रोजगार सेवकाच्या मनमानी कारभारावर आवाज उठवत सायगव्हान ग्रामपंचायत येथे भिलदरी तांडा येथिल ऋषिकेश चव्हाण (Rishikesh Chavan) आणि धारासिंग राठोड (Dhara Singh Rathod) यांनी गुरुवारी (दि.8) ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलनात ग्रामपंचायत (Saigavhan Gram Panchayat) रोजगार सेवक यांच्या विरूद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान सायगव्हान ग्रामपंचायत (Saigavhan Gram Panchayat) येथे महीला सरपंच असून रोजगार सेवक हा मी सरपंच असल्याचे सांगून शासनाच्या वरिष्ठ अधिकारी व नागरिकांची फसवणूक करत आहे. यामुळे या प्रकरणाची तक्रार कन्नड तालुक्याचे (Kannada Taluka) गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे केली होती. पण याबाबत कोणतीही चौकशी झाली नसल्याने आम्ही हे ठिय्या आंदोलन करत असल्याचे ऋषिकेश चव्हाण आणि धारासिंग राठोड यांनी सांगितले.

दरम्यान या प्रकरणी ग्रामपंचायत सायगव्हानच्या वतीने या आंदोलन कर्त्यांची बाजू गुरुवारी सायंकाळी वरिष्ठ अधिकारी यांना कळवली.
याबाबत पुढील सुनवाई सोमवारी (दि.19) गट विकास अधिकारी यांच्या दालनात केली जाईल,
असे पत्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी आदोलकांना दिले. यानंतर आंदोलकांनी त्यांचे ठिय्या आंदोलन मागे घेतले.
पण योग्य कारवाई व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Saigavhan Gram Panchayat | A protest against the arbitrary conduct of the Rozgar Sevak

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…