Sakinaka Fire News | मुंबईतील साकीनाका परिसरात अग्नितांडव, दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू; 9 जण थोडक्यात बचावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sakinaka Fire News | मुंबईतील साकीनाका परिसरातील एका दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू (Workers Death) झाल्याची घटना (Sakinaka Fire News) घडली आहे. आगीची ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ज्यावेळी दुकानाला आग (Shop Fire) लागली त्यावेळी दुकानात 11 कामगार झोपले होते. यातील नऊ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका परिसरात असलेल्या राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर (Rajshree Electric & Hardware) या दुकानाला मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग (Sakinaka Fire News) लागली. दुकानातून आगीचे लोळ उठलेले पाहून स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला (Fire Brigade) दिली. अग्निमशन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन 11 कामगारांना बाहेर काढले. या घटनेत 2 कामगार होरपळल्यामुळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राकेश गुप्ता (वय-22) आणि गणेश देवासी (वय-23) अशी मृत्यू झालेल्या दोन कामगारांची नाव आहेत.

विझलेली आग पुन्हा भडकली

आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी अथक प्रयत्न करुन साडेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आणली.
त्यानंतर पाच वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली.
यानंतर पुन्हा काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. त्यानंतर याठिकाणी कुलिंगचे काम करण्यात आले.

कोट्यवधी रुपयांचे नुकसान

मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-1 असल्याचं घोषित केलं आहे.
दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे.
मुंबईतील मोठं हार्डवेअर दुकान म्हणून या दुकानाची ओळख होती.
या आगीत दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स आणि इतर साहित्य जळून खाक झालं आहे.

Web Title : Sakinaka Fire News | a fire broke out at a hardware shop in sakinaka area of mumbai death of 2 workers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची खुर्ची धोक्यात, न्यायालय मुख्यमंत्रीपद काढून घेऊ शकते? जाणून घ्या सविस्तर

MNS Leader Sandeep Deshpande | राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला, म्हणाले-‘…की घरी बसून अंडी उबवणार?’