‘भाईजान’ सलमाननं शिल्पा शेट्टीसोबत केला ‘रोमँटीक’ डान्स ! व्हायरल झाला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. व्हिडीओत सलमान खान अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत रोमँटीक डान्स करताना दिसत आहे. हा एक जुना व्हिडीओ आहे. हम दिल दे चुके सनम सिनेमातील चांद छुपा बादल में या गाण्यावर सलमान आणि शिल्पा काही स्टेप्स करताना दिसत आहेत.

सलमान खान आणि शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. चांद छुपा बादल में या गाण्यात काही स्टेप्स करताना दोघांचा रोमँटीक अंदाज दिसत आहे. व्हिडीओ जरी जुना असला तरी नव्यानं चर्चेत असून सोशलवर व्हायरल होत आहे. एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ असून सध्या सोशलवर जोरदार चर्चेत आहे.

https://www.instagram.com/p/CCg8jHihlXc/?utm_source=ig_embed

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही.