दीपिकासोबत आतापर्यंत चित्रपट न करण्यामागचे सलमानने सांगितले ‘हे’ कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आतापर्यंत सर्वच टाॅप अभिनेत्रींनी सुपरस्टार सलमान खानसोबत काम केले आहे. परंतु अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि सलमान खान यांची जोडी अद्याप पडद्यावर दिसली नाही. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानने दीपिकासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दीपिकासोबत काम न करण्याचे कारण सलमानने स्पष्ट केले आहे.

एका मुलाखतीत बोलताना दीपिकाशी संबंधित विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सलमान म्हणाला की, “इतक्या वर्षांत आम्हा दोघांना चित्रपटात एकत्र आणण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.” अशी खंत सलमानने व्यक्त केली. याशिवाय दीपिकासोबत काम करण्यासाठी चित्रपटाची कथादेखील रंजक असायला हवी आणि सध्या माझ्याकडे अशी कोणतीच कथा नव्हती असेही सलमान म्हणाले. दरम्यान ही जोडी संजय लीला भन्साळी यांच्या ईन्शाल्ला चित्रपटात एकत्र दिसणार अशी चर्चा होती. त्यामुळे या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक होते पण या चित्रपटात दीपिकाऐवजी आलियाची वर्णी लागली.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने भारत चित्रपटाला नकार देताच या चित्रपटासाठी दीपिकाच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. परंतु त्यावेळी दिपिका आणि अभिनेता रणवीर सिंग विवाहबंधनात अडकणार होते. त्यामुळे दीपिकाने या चित्रपटासाठी नकार दिला. आता अभिनेत्री कतरिना कैफ या चित्रपटात सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.