Salman Khan | ‘किसी का भाई किसी की जान’मधील नवीन गाणे रिलीज; गाण्यामुळे नेटकऱ्यांनी केले सलमान खानला ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Salman Khan | सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे.सलमान खानचा ‘टायगर 3’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. अनेक दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटातील सलमान खानचा फर्स्ट लूक ही समोर आला होता. आता नुकताच चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी सलमान खानला चांगलेच ट्रोल केले आहे. (Salman Khan)

 

आज किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सुखबीरने गायले आणि संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहे. हे गाणे प्रदर्शित होण्याआधी या गाण्याचा टीझर इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला होता. टीझर पाहून चाहत्यांना या गाण्याकडून खूपच अपेक्षा होत्या. टीझरला चाहत्यांनी भरभरून प्रेम देखील दिले होते. मात्र संपूर्ण गाणे समोर आल्यानंतर चाहत्यांच्या अपेक्षाभंग झाल्या आणि त्यांनी आता या गाण्याला त्याच बरोबर सलमान खानला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. (Salman Khan)

 

बिल्ली बिल्ली या गाण्यात सलमान खान बरोबरच श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी, बिग बॉस फेम शहनाझ गिल, भाग्यश्री आणि पूजा हेगडे दिसत आहेत. मात्र हे गाणे नेटकऱ्यांना काही फारसे भावले नसल्याचे दिसत आहे. या गाण्यावर सध्या अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. एका नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले की “सलमान खान आणखीन एका गाण्याचा आणि आणखीन एका चित्रपटाचा रिमेक घेऊन आला आहे”. तर दुसऱ्या एकाने म्हटले “भाई वेडा झाले आहे का काहीही काय गाणी घेऊन येत आहे”, “त्यापेक्षा पहिला गाणं बरं होतं” अशाप्रकारचे एक ना अनेक कमेंट सध्या या गाण्यावर पाहायला मिळत आहेत. (Salman Khan)

 

किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे बरोबरच व्यंकटेश दग्गुबती,
पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
तर फरहाद सामजी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. येत्या 21 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title :- Salman Khan | salman khan gets troll for his new song of kisi ka bhai kisi ki jaan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने मोडला कपिल देवाचा तो रेकॉर्ड; ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Uddhav Thackeray | भाजपची निती वापरा आणि फेका, पोटनिवडणुकीच्या निकालावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ)