Salman Khan | सलमान खान लवकरच अडकणार विवाह बंधनात?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Salman Khan | मागील अनेक वर्षापासून स्टार बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) विवाहाची चर्चा सिनेक्षेत्रातच नाही तर देशभरात खेळत आहे. लग्नाच्या मुद्यावरुन सलमान खानवर अनेक चर्चा पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर सलमान खानने विवाह करावा यासाठी अनेक जण बोलूनही दाखवले आहेत. दरम्यान स्वतःला सिंगल समजल्या जाणाऱ्या सलमान खानला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे दिसते.

 

सलमान खानने (Salman Khan) आपल्या रिलेशनशिप (Relationships) स्टेटसचा खुलासा केला आहे, हा खुलासा ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सलमान खानने बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये याबाबत मोठा खुलासा केला आहे. प्रथमच सलमानने या विषयावर बोलले आहे. बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल (Shahnaz Gill) या शोमध्ये येणार आहे जिच्यासोबत सलमान स्टेजवर मौजमस्ती करताना दिसत आहे. तसेच शहनाजही सलमानची गुपित समोर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शेवटी सलमान आता आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सर्वांना सांगणार असल्याचं कळते.

 

शेअर केलेल्या शोचा नवा प्रोमोमध्ये शहनाज गिल (Shahnaz Gill) कतरिना कैफचे (Katrina Kaif) नाव घेऊन सलमानला चिडवताना दिसत आहे. त्यात शहनाज व्हिडिओमध्ये म्हणते की मी पंजाबच्या कतरिना कैफपासून भारताची शहनाज गिल बनले आहे कारण भारताची कतरिना पंजाबची कतरिना झालीय. तर, शहनाजचे म्हणणे ऐकल्यानंतर सलमान सांगतो की, हे बरोबर आहे. सगळे खूश आहेत. यावर शहनाज सलमानला म्हणते की सर तुम्ही खुश राहा.

शहनाज म्हणते की, ‘सॉरी मी जास्त बोलले नाही ना. यानंतर शहनाज म्हणते की सिंगल्स अधिक चांगले दिसतात.
यावर सलमान म्हणतो की हे चांगले आहे, यानंतर शहनाज सलमानला विचारते, मग रिलेशनशीपमध्ये आहात का? यावर सलमान खान हो म्हणतो.
त्यानंतर आता सलमानने डेटिंग बाबत कबुली दिल्याने तो लवकरच विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता सगळ्यानांच सलमानच्या पत्नीचा चेहरा बघण्याची उत्सुकता आहे.

 

Web Title :- Salman Khan | salman khan is dating someone will get married soon?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1696 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | पुण्याच्या विश्रांतवाडीत 2 किलो सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 4 जणांना अटक

 

Nawab Malik | नवाब मलिकांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘सगळ्यात जास्त दारु पिणारे भाजपचे नेते’