‘या’ कारणामुळे सलमान खान कायम घालतो काळ्या रंगाचे कपडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या लग्नाविषयी वेळोवेळी अनेक अफवा समोर आल्या आहेत . त्याच्या अनेक चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, सलमान लग्न कधी करणार आहे? सलमानची त्याची एक वेगळी स्टाईल आहे. सलमानच्या लग्नासारखाच आणखी प्रश्न चाहत्यांना विचार करायला लावत आहे तो म्हणजे सलमान नेहमी काळ्या रंगाच्या कपड्यात का दिसतो ? सलमान खानच्या फॅशन डिझायनरनेच याबाबत खुलासा केला आहे.

अ‍ॅशले रेबेलो असं सलमानच्या फॅशन डिझायनरचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो सलमानसाठी काम करतो आहे. त्याने इन्स्टाग्रामवर लाईव्ह केलं होतं. चाहत्यांना प्रश्नांना तो यावेळी उत्तर देत होता. यावेळी एकाने त्याला सलमानच्या काळ्या रंगाच्या कपड्याबद्दल प्रश्न विचारला. सलमान कपड्याची स्टाईल बदला. तो नेहमी काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये का दिसतो? असा प्रश्न एका फॅनने केला. त्यावर अ‍ॅशलेने त्याला उत्तर दिले. सलमानला काळ्या रंगाशिवाय इतर कोणताही रंग आवडत नाही असा खुलासा अ‍ॅशलेने यावेळी केला.

हेच मुख्य कारण आहे की भाईजान सलमान खान नेहमीच काळ्या रंगाच्या कपड्यात दिसतो. अ‍ॅशलेने फक्त चाहत्यांच्या शंकेचे निरसण नाही केले तर सलमान कोणता रंग आवडतो हेदेखील चाहत्यांना सांगितले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like