Samantha Ruth Prabhu | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यावर समंथा फिदा ! व्यक्त केली ‘ही’ इच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिचा काही काळापूर्वी अभिनेता नागा चैतन्यसोबत (Naga Chaitanya) घटस्फोट (Divorce) झाला होता. यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे (Personal Life) चर्चेत आहे. अशा परिस्थितीत आता तिची काही जुनी वक्तव्ये आणि किस्से सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आली आहेत. समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) संबंधित अशीच एक गोष्ट आता समोर आली आहे.

 

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या करिअरमध्ये प्रगती करत असून ‘फॅमिली मॅन 2’ सिरीज रिलीज (Family Man 2 Series Release) झाल्यापासून ती हिंदीतही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सिरीजच्या प्रमोशन दरम्यान समंथाने अनेक मुलाखती (Interview) दिल्या. यापैकी एक मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. वास्तवीक ज्यावेळी तिला विचारण्यात आले की, जर तिला बॉलिवूड चित्रपट मिळाला तर, तिला कोणत्या बॉलिवूड स्टारसोबत पडद्यावर रोमान्स करायला आवडेल. त्यावेळी तिने रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) नाव घेतले.

 

रणबीर कपूर हा समंथाचा आवडता अभिनेता असल्याचे तिच्या बोलण्यातून स्पष्ट होते. यावेळी तिने खुलासा करताना सांगितले की, एकेकाळी तिला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र भाषेच्या समस्येमुळे तिने चित्रपट नाकारले होते.

 

परंतु, समंथाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नसले, तरी साऊथमध्ये काम करुन नाव कमावले आहे.
आज ती सर्वांची आवडती अभिनेत्री बनली आहे. ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) चित्रपटातील
‘ऊ अंटवा’ या आयटम साँगची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ पहाला मिळत असून हेच सध्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu | samantha ruth parbhu wants to work with ranbir kapoor in bollywood movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा