Health Benefits Of Pulses | डाळ खाण्यापूर्वी आवश्यक करा ‘हे’ काम, होतील दुप्पट फायदे, केवळ ‘या’ गोष्टीची घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Benefits Of Pulses | निरोगी जीवनशैलीसाठी आरोग्यदायी गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे. आपण ज्या प्रकारचे अन्न खातो, किती प्रमाणात खातो, यानुसार आपली जीवनशैली निरोगी बनते आणि रोगांचा धोका कमी होतो. अशा स्थितीत तुम्हाला निरोगी ठेवण्यात डाळी महत्त्वाची भूमिका बजावतात. डाळ ही भारतीय स्वयंपाकघरातील आवश्यक घटकांपैकी एक आहे. (Health Benefits Of Pulses)

 

डाळ पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि आपले आरोग्य सुधारण्यास मदत करते. डाळीचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक डाळीची स्वतःची खासियत आहे.

 

तूर, हरभरा, मसूर, राजमा, वाटाणा, उडीद अशा अनेक डाळी आहेत. फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, झिंक आणि पोटॅशियम डाळींमध्ये आढळतात. ही सर्व पोषकतत्व शरीरासाठी खूप महत्वाची आहेत. यासोबतच त्यात भरपूर खनिजे, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर्स असतात जे पचनास मदत करतात.

 

मात्र, कोणत्याही डाळीचे सेवन करताना, आपण काही नियमांचे पालन केले पाहिजे, यामुळे त्यांचे आणखी फायदे होतात. पोषणतज्ञ रुजुता दिवेकर (Nutritionist Rujuta Diwekar) यांनी पोषकतत्वे कमी न होता डाळींचा अधिकाधिक फायदा कसा मिळवावा याबद्दल काही टिप्स शेअर केल्या आहेत.

 

रुजुता यांच्या मते, कडधान्य खाताना 3 नियम पाळणे फार महत्वाचे आहे (3 rules while eating pulses).

 

1. शिजवण्यापूर्वी डाळी भिजवून अंकुरित करा (Soak the pulses and germinate before cooking)
प्रोटीन, व्हिटॅमिन यांसारखे खनिज घटक डाळींमध्ये आढळतात, तसेच यात काही पोषक घटक (म्हणजे अँटी न्यूट्रिएंट्स) असतात. अँटी-न्यूट्रिएंट्स हे पोषक असतात जे आपल्या शरीरातील आवश्यक पोषक तत्वांचे शोषण कमी करतात आणि अन्नाचे पौष्टिक मूल्य कमी करतात. (Health Benefits Of Pulses)

 

त्यामुळे अनेकांना डाळी खाल्ल्यानंतर अपचन, गॅस आणि पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो.
अशा स्थितीत, शिजवण्यापूर्वी डाळी भिजवून आणि अंकुरित केल्याने अँटी न्यूट्रिएंट्सचा प्रभाव कमी होतो आणि पोषक तत्वांचा प्रभाव वाढण्यास मदत होते.

2. विविध डाळींचे करा सेवन (Make a variety of pulses)
रुजुता दिवेकर यांनी सांगितले की, भारतात शेंगा आणि कडधान्यांच्या सुमारे 65000 जाती आढळतात.
त्यांनी पुढे सांगितले की, एका आठवड्यात किमान 5 वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वेगवेगळ्या पद्धतीने खाव्यात.
तुम्ही डाळीपासून बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी जसे की डोसा, पापड, लाडू किंवा हलवा इत्यादी खाऊ शकता.
वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खाल्ल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

 

3. धान्ये आणि शेंगांसह सेवन करा डाळ (Eat dal with grains and legumes)
धान्य आणि शेंगांसोबत खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यासोबतच इम्युनिटी वाढते.
याशिवाय डाळींच्या या मिश्रणामुळे शरीरात अँटीबॉडीज वेगाने तयार होतात.
यासोबतच डाळींचे मिश्रण अशा प्रकारे खाल्ल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करता येते.

 

Web Title :- Health Benefits Of Pulses | keep these 3 things in mind while eating pulses you will get all these benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | ‘पुणे मनपात जे घडलं ते अपघातानं, मुख्यमंत्री असलं काम करत नाहीत’ (व्हिडीओ)

 

Sleeping Problem | रात्री तुम्ही सुद्धा उशीरपर्यंत जागता का? ‘ही’ एक गोष्ट खाल्ल्याने 2 मिनिटांत येईल झोप

 

Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाडांची टोलेबाजी; म्हणाले – ‘शिवसेनेच्या मनातील सांगायला मी ज्योतिष नाही’