Sambhaji Bhide | ‘विषबाधा, भूतबाधा पेक्षा भयंकर अशी ‘गांधी बाधा’ हिंदुस्थानला झाली आहे’ – संभाजी भिडे

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sambhaji Bhide | ‘माणसाला झालेली विषबाधा, भूतबाधा याच्यावर उपाय करता येतो, मात्र त्याच्या पेक्षाही भयंकर तीन बाधा हिंदुस्थानला झाल्या. म्लेंच बाधा, अंग्ला बाधा आणि गांधी बाधा,’ असं विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं आहे. सांगलीतील मिरज (Sangli Miraj) येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा परिसराच्या सुशोभिकरण लोकार्पण सोहळादरम्यान संभाजी भिडे उपस्थित होते.

 

मिरज येथे शिवतीर्थ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अनावरण प्रसंगी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) बोलत होते. ”हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा, तिसरी गांधी बाधा. या तिन्ही बाधावर तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची उपासना आपण केली पाहिजे.” असं विधान संभाजी भिडे यांनी केले. ” म्लेंच बाधा म्हणजे पाकिस्तान बांगलादेशच्या मुस्लिम समाजाच्या विचारांची बाधा, आंग्ल बाधा म्हणजे इंग्रज आपल्यावर स्वार झाले आणि त्यामुळे आलेली इंग्रजी विचारांची बाधा आणि शस्त्र विना स्वतंत्र मिळते हा विचार म्हणजे गांधी विचाराची बाधा. अशा 3 बाधा हिंदुस्थानला झाल्या असल्याचं,” ते म्हणाले.

पुढे बोलताना संभाजी भिडे म्हणाले, ”देशाला शक्तीशाली करायच असेल तर संपूर्ण हिंदुस्तानमधील 123 कोटी लोकांचा रक्तगट बदलून
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा रक्त गट केला पाहिजे,” असं म्हणत पुढे ते म्हणाले,
‘या माय भूमीतल्या कपाळा मधील हिंदुत्वाच्या स्वातंत्र्याचं कुंकू टिकवणारा आणि जगाचा संसार चालवणारा
हिंदुस्थान जर घडवायचा असेल तर हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचारच करू शकतात,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sambhaji Bhide | ‘Hindustan has got’ Gandhi Badha ‘worse than poisoning, ghost badha’ – Sambhaji Bhide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा