कोरेगाव भीमा : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह 163 जणांना जिल्हा बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या दिवशी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह १६३ जणांना ग्रामीण पोलिसांनी जिल्हा बंदी जाहीर करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. यावेळी २०१७ मध्ये येथे मोठी दंगल झाली होती. या दंगल प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. एकबोटे यांना अटकही करण्यात आली होती़ मात्र, संभाजी भिडे यांची चौकशी अद्याप करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ज्या ज्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ज्यांनी याबाबत प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत, त्यांना जिल्हा बंदी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी माहिती दिली. १ जानेवारीला राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांना तेथे जाहीर सभा घेण्यास परवानगी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अभिवादनासाठी येणाऱ्या लोकांच्या सोयीसुविधांसाठी पिण्याचे पाणी पुरविणे, फिरते स्वच्छतागृहे, एस टी, पीएमपी बसची सोय उपलब्ध करुन देण्याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/