Sambhaji Bhide | पुण्यात संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन, तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो, असे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात एका महिला पत्रकाराला बोलणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात सध्या राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. यावरूनच आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस महिला आघाडीने (Pune Congress Mahila Aghadi) आंदोलन केले. यावेळी संभाजी भिडेंच्या (Sambhaji Bhide) फोटोला महिलांनी टिकली लावून निषेध नोंदविला.

 

संभाजी भिडेंनी मुंबईत महिला पत्रकाराबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात अनेक ठिकाणी पडसाद उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात काँग्रेस (Pune Congress) महिला आघाडीने टिकली न लावता आंदोलन केले. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा, माजी नगरसेविका संगीता तिवारी (Sangeeta Tiwari) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी संगीता तिवारी यांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना सल्ला देताना म्हटले की, तुम्ही आधी घरातून सुरुवात करा, नंतर पत्रकारांना सांगा. तुमच्या सुनबाई अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) तुमच्यासमोर तशाच येतात ना. त्या तर महाराष्ट्राच्या वहिनी आहेत, मग त्यांनीही कुंकू टिकली लावली पाहिजे. आधी घरातून सुरुवात करा.

तिवारी म्हणाल्या, आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण? संविधानाने आम्हाला कसे राहायचे, काय घालायचे याचा हक्क दिला आहे.
उद्या तुम्ही जीन्स, टी-शर्ट घालू नका, डोक्यावर पदर घ्या असे सांगाल.
हा काय तालिबान आहे का? हा भारत देश असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालतो. बायकांनी कुंकू लावायचे की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?

 

संगीता तिवारी म्हणाल्या, तुम्ही भारतामाता धर्मांध केली आहे, आमची भारतमाता सर्वांना सामावून घेणार नाही असे तुमचे म्हणणे आहे.
तुमच्यासारख्या माथेफिरु, धर्मवेड्यांनी भारतमातेचे नाव खराब केले आहे. आम्ही मात्र ते होऊ देणार नाही.
आम्ही तुम्हाला कोणत्या ब्रँडचे धोतर घालावे सांगितलेले नाही.

 

Web Title :- Sambhaji Bhide | pune congress protest against sambhaji bhide over controversial statement on woman without bindi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CCL | सीसीएलकडून पुण्‍यामध्‍ये वनस्‍पती-आधारित मांस उत्‍पादनांची श्रेणी लॉन्‍च

Lingayat Community | राज्यस्तरीय उच्च शिक्षीत लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा रविवारी पुण्यात

Gulabrao Patil | ‘सुषमा अंधारे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट’, गुलाबराव पाटलांची जळजळीत टीका