‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगडावर raigad झालेल्या शिवराज्यभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर sambhaji raje खासदार संभाजीराजे भोसले sambhaji raje यांनी आपली भूमिका मांडली. आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला.

हो आहे मी संयमी. पण इधून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाही.

मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

काय होईल ते होईल.म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावलं.

16 जूनला पहिला मराठा मोर्चा

खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरुन आंदोलनाची हाक दिली आहे.

येत्या 16 जूनला पहिला मराठा मोर्चा काढणार असल्याचे संभाजीराजेंनी जाहिर केले.

पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून सामान्य मराठा जनतेनं रस्त्यावर येऊ नये, असं देखील खा. संभाजीराजे यांनी म्हटले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याचे संभाजीराजे यांनी जाहिर केले.

पहिली लाठी संभाजीराजेंना मारावी लागेल

मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई ते पुणे लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा खा. संभाजीराजे यांनी यावेळी दिला. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही

माझा लढा 70 टक्के गरीब माराठ्यांसाठी आहे. आपलेच पुढारी कोण चुकलं-कोण बरोबर या स्पर्धेत लागले. मागच्या सरकारचे लोक म्हणाले आत्ताच्या सरकारने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचं सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. मी मोठा की तू मोठा, हेच चाललं आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, असा शब्दांत खा.संभाजीराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला.

Also Read This : 

 

Remdesivir Injection : देशातील 3 मोठ्या डॉक्टरांनी सांगितले, कोरोनावर कशी करावी मात; रेमडेसिवीर ’रामबाण’ नाही

 

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त

 

पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या

 

अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात !