Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा, राष्ट्रवादीचा पाठिंबा; शरद पवारांनी सांगितला विजयाचा ‘हा’ फॉर्म्युला

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला (Rajya Sabha candidate) पाठिंबा (Support) जाहीर केला आहे. आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ असं शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष (Independent) म्हणून अर्ज दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासाठी त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची (MLA) व निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केली आहे. आता शरद पवार यांनी नांदेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पाठिंबा दिला आहे.

 

शरद पवार म्हणाले,महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ.

शरद पवारांनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला
शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी व काँग्रेसचे (Congress) प्रत्येकी एक खासदार (MP) निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मते शिल्लक राहतात. तर पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरुन महाविकास आघाडीकडे एकूण 46 मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात.

 

महाराष्ट्रात 6 जागा
राज्यसभेच्या द्वीवार्षिक निवडणुकीचा कार्य़क्रम जाहीर झाला आहे. देशभरातील 57 जागांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील 6 जागांचा यामध्ये समावेश आहे. शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut),
भाजपचे पीयूष गोयल (Piyush Goyal), विकास महात्मे (Vikas Mahatme),
विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahastrabuddhe), राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल (Praful Patel)
आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांचा कार्यकाळ संपल्याने 6 जागांवर निवडणूक होत आहे.
राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे 2, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी होईल. तर सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी भाजपकडे नाही. त्यामुळे सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | NCP Chief sharad pawar announce mva support to sambhajiraje chhatrapati in rajyasabha election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | महागाईसाठी तत्कालीन पंतप्रधानांना भाजपने बांगड्या पाठवल्या होत्या, तीच भेट सध्याच्या पंतप्रधानांना देण्याची वेळ आली; प्रशांत जगताप यांचा हल्लाबोल

 

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार, ‘या’ नंबरवर तुम्ही चेक करू शकता बॅलन्स; जाणून घ्या

 

Smriti Irani In Pune | स्मृती इराणींच्या कार्यक्रमात BJP च्या कार्यकर्त्यांकडून NCP च्या महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण