Sameer Wankhede | मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार ! समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई एनसीबीचे (Mumbai NCB) प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याचे समोर आले आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी एनसीबीमध्ये कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ (Extension) मागितली नसल्याचे समोर आलं आहे. एनसीबीनं याविषयीची माहिती दिल्याचं ट्विट एका वृत्तसंस्थेने केले आहे.

 

समीर वानखेडे (Sameer Wankhede) डेप्युटेशनवर सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीच्या मुंबई कार्यालयात रुजू झाले होते. ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या कालावधीत समीर वानखेडे यांनी 96 जणांना अटक (Arrest) करत 28 केसेस दाखल केल्या. तर 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक करत 117 केसेस दाखल केल्या आहेत. वानखेडे यांनी त्यांच्या काळात 1 हजार कोटी रुपयांचं 1791 किलो ड्रग्ज जप्त (Drugs confiscated) केलं तर काही संपत्ती देखील जप्त केली.

 

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनवर कारवाई
समीर वानखेडे एनसीबीमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा रिया चक्रवर्तीला (Riya Chakraborty) अटक केली. समीर वानखेडे यांच्याकडून दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), भारती सिंग (Bharti Singh) यांना सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput death case) ड्रग्ज कनेक्शनवरुन (Drugs connection) चौकशीला बोलावलं होतं.

आर्यन खान प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात
समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील (Cordelia Cruz) पार्टीवर छापा टाकून अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्यासह 8 जणांना अटक केली. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आर्यन खान प्रकरण हा फर्जीवाडा आणि खंडणीचं प्रकरण (Ransom case) असल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर केला. याच प्रकरणातील साक्षीदार यांच्यावरुन देखील वाद निर्माण झाला होता.

 

2008 च्या बॅचचे IRS अधिकारी
समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी (IRS officer) आहेत.
ते सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीमध्ये डेप्युटेशनवर रुजू झाले होते.
त्यापूर्वी ते डीआरआय मध्ये (DRI) कार्यरत होते.
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी मुदत वाढ मागीतली नसल्याची माहिती आहे.

 

 

Web Title :- Sameer Wankhede | NCB mumbai zonal director sameer wankhede tenure to end on 31dec 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

New Debit-Credit Card Rules | 1 जानेवारीपासून लागू होतील क्रेडिट-डेबिट कार्डचे नवीन नियम, तुम्हाला कसे करतील प्रभावित, जाणून घ्या

Indian Railways | रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ट्रेनमध्ये महिलांना सीट मिळण्यात येणार नाही अडचण, मिळेल ‘रिझर्व्ह बर्थ’

MoRTH | आता कमी होईल अपघाताचा धोका ! रोड सेफ्टी फीचर्ससह रस्ते मंत्रालयाने लाँच केले नवीन नेव्हीगेशन अ‍ॅप