Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार, धनंजय मुंडे यांनी दिले ‘हे’ संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर (Mumbai Cruise Drug Party) छापा टाकून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Case) अटक करणारे एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वानखेडे यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला. त्यामुळे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पुण्यातील एका कार्यमासाठी धनंजय मुंडे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वानखेडे यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेबद्दल कोणी आक्षेप नोंदवला तर सामाजिक न्याय विभाग त्याची चौकशी करेल, असे विधान मुंडे यांनी केले आहे.

 

धनंजय मुंडे यांच्या या विधानानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर पलटवार केला आहे.
राज्य सरकार वानखेडे यांच्या विरोधात अजेंडा राबवत आहे. सरकारकडून वानखेडेंना लक्ष्य केलं जात आहे.
वानखेडे ना आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ना कोण्या भाजप (BJP) नेत्याचे नातेवाईक.
पण अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्या विरोधात राज्य सरकारकडून (State Government) घेतली जाणारी भूमिका निषेधार्ह असल्याचे दरेकर म्हणाले.

 

Web Title :- Sammer Wankhede | NCB officer sameer wankhede s caste certificate may be probed says ncp leader and minister dhananjay munde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nawab Malik | नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट ! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप (व्हिडिओ)

Mumbai Local Train | मुंबईकरांची लोकल प्रवासकोंडी दूर होणार, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

Heart Attack | नियमित जिम जाणार्‍यांना हार्ट अटॅकचा धोका जास्त का?, जाणून घ्या देशातील प्रमुख कार्डियक सर्जन काय म्हणतात