Mumbai Local Train | मुंबईकरांची लोकल प्रवासकोंडी दूर होणार, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीपूर्वी मुंबईकरांसाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठा निर्णय घेतला आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसचे (Covid preventive vaccines) दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशा प्रवाशांना आता मुंबई उपनगरीय लोकलचं तिकिट (Mumbai Local Train) उपलब्ध होणार आहे. याबाबत शनिवारी राज्य सरकारने मध्य (Central) आणि पश्चिम रेल्वेला (Western) पत्र लिहिले असून आज यासंदर्भात रेल्वेकडून (Railway Administration) निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांची लोकल प्रवास कोंडी (Mumbai Local Train) दूर होणार आहे. दरम्यान, तिकीट खिडकीवर (ticket window) तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

कोविड प्रतिबंधात्मक लसचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या सर्व प्रवाशांना लोकलची (Mumbai Local Train) दारे उघडण्यात आलेली आहेत. युनिव्हर्सल पास असणाऱ्या प्रवाशांना मासिक, त्रैमासिक, सहामाही पास सध्या उपलब्ध करण्यात आला होता. परंतु दैनंदिन तिकीट सुविधा मात्र बंद होती. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्या अनेकांना लोकलचा प्रवास करता येत नव्हता. त्यातून तिकिटाशिवाय प्रवास करणारे प्रवासी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेचा महसूल देखील बुडत आहे. या सर्व बाबींचा विचार करता रेल्वे प्रशासनाकडून देखील मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Pune Accident | दुर्दैवी ! बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

ठाकरे सरकारने (Thackeray Government) मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेला
(Western Railway) शनिवारी पत्र लिहिलं असून ज्यांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे व दुसरी लस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत
अशा सर्वांना प्रवासासाठी सर्व प्रकारची तिकीट सेवा खुल्या करण्यात याव्यात.
त्यात तिकीट खिडकीवर पूर्वीप्रमाणे तिकीटही उपलब्ध करुन द्यावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
लोकल तसेच पॅसेंजर ट्रेनने प्रवास करण्यासाठी सर्व प्रकारची तिकीट सेवा (local train daily tickets now permitted) खुली करताना जी नियमावली आखून देण्यात आली आहे त्याचेही पालन केले जावे,
असे पत्रात नमूद केले आहे.
ही मुभा देताना ज्यांचं संपूर्ण लसीकरण झालेलं नाही,
अशा व्यक्तीला लोकल प्रवासास मनाई राहील व त्याची जबाबदारी रेल्वेने घ्यायची आहे.
त्यासाठी रेल्वेने आपली संबंधित यंत्रणा राबवावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

राज्य सरकारने लिहिलेल्या पत्रावर रेल्वेकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
रेल्वेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता आहे.
तसे झाल्यास येत्या एक ते दोन दिवसात मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर पूर्वीप्रमाणे तिकीटसेवा सुरु होणार आहे. हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा असणार आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणूकीसह पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान मन्नतवर पोहचला पण ‘या’ कारणामुळं मुनमुन धमेचा तुरूंगातच अडकली, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mumbai Local Train | mumbai local train daily tickets now permitted maharashtra government writes letter to Central railway and western railway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update