सना खाननं ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडला परत केले ‘कपडे’, ‘शुज’, सांगितलं दु:ख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि बिग बॉसची माजी स्पर्धक सना खान आणि मेल्विन लुईसच्या ब्रेकअपच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहे. सनानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मेल्विननं तिला धोका दिल आहे.

ब्रेकअपनंतर सनानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत खूप अटेंशन घेतलं होतं. सनानं एक फोटो शेअर केला होता. या फोटोत सनाच्या हाता बर्गर होता आणि ती दुसरीकडे बघत होती. फोटोमध्ये तिनं लिहलं होतं की, “जेव्हा वेटर तुमच्या बॉयफ्रेंडपेक्षा जास्त हँडसम असतो.”

एका चॅट शोमध्ये सनानं अनेक खुलासे केले. सना म्हणाली होती की, “गेल्या वॅलेंटाईनला मला त्यानं रिलेशनशिप ऑफिशियल करण्यासाठी फोर्स केला. तो नेहमीच आमचे फोटो पोस्ट करण्यासाठी प्रवृत्त करत होता.

सनानं सांगितलं दु:ख

सना म्हणाली, “तो मला रडताना एकटं सोडून पार्टीसाठी गेला होता. मी त्याला म्हटलं होतं की, तो माझे पैसे आणि वेळ दोन्हीही वाया घालवत आहे. त्यानं मला सांगितलं होतं की, तो माझे Krabi च्या तिकीटाचे पैसे परत देईल.तो मला असंही म्हणाला की, त्यानं मला जे काही दिलं आहे ते सगळं परत दे. मी तर त्याला ब्रँडेड स्टफ, चार जोडी स्निकर गिफ्ट केले. मला त्यानं काय दिलं एक ब्रेसलेट, एक चेन आणि डिप्रेशन.”

View this post on Instagram

✨✨

A post shared by Sana Khaan (@sanakhaan21) on

ब्रेकअपनंतर सनानं कपडे आणि शुज बॉयफ्रेंडला परत पाठवले

सनानं सांगितल की, “मी 3 फेब्रुवारीला सर्वकाही(कपडे, शुज आणि इतर सर्वच वस्तू) परत देऊन आले. मी त्याच्या आईला कॉल केला होता. मी लहान मुलीसारखं रडत होते. त्याची आई मला म्हणाली होती की, बाळा असं होत असतं. जेव्हा तुम्ही लिव इनमध्ये असता तेव्हा अशा गोष्टी होतातच.” यानंतर सनानं फोन ठेवून दिला होता.

 

You might also like