Sandeep Deshpande | मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची मनसेने केली कोंडी; मनसेनेते संदिप देशपांडे यांची युवासेना पदाधिकाऱ्याविरोधात ईडीकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sandeep Deshpande | मुंबई महापालिका निवडणुक (Mumbai Municipal Elections) तोंडावर आली असतानाच मनसेने (MNS) शिवसेनेच्या ठाकरे गटाविरूध्द जोरदार मोहिम हाती घेतली आहे. कोविड काळात केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे (Yuva Sena) नेते वैभव थोरात (Vaibhav Thorat) आणि महापालिका पदाधिकारी यांच्याविरोधात मनसे नेते संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ईडी आणि ईओडब्लूकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आता चौकशी होणार आहे.

 

काही दिवसांपूर्वी कोविड काळात केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत मनसे नेते संदिप देशपांडे यांनी पुरावे सादर करत तक्रार दाखल केली होती. मुंबई महापालिका प्रशासक ईक्बालसिंह चहल यांच्यावर ईडीकडून याप्रकरणी चौकशी देखील सुरू झाली आहे.

 

‘या घटनेला विविध बाजू आहेत, त्यामुळे विविध तपासी यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आम्ही वारंवार सांगत होतो विरप्पन गँगनं मुंबईला लुटण्याचं काम केलं आहे. विरप्पनने मुंबईला जेवढे लुटले नसेल तेवढं या गँगन कोरोना काळात मुंबईला लुटलं आहे. याचे पुरावे देखील सादर करण्यात आले आहेत.’ असे यावेळी बोलताना संदिप देशपांडे म्हणाले.

 

‘२५-३० कोटी पर्यंत हा भ्रष्टाचार झाला आहे, याची व्याप्ती ७०-७५ कोटींपर्यंत देखील जाऊ शकते. आम्ही ईओडब्ल्यूकडे देखील तक्रार केली आहे. मनी लाँड्रिंगचा देखील ॲंगल आहे. त्यामुळे ईडीकडे देखील तक्रार केली आहे. पालिकेकडे देखील तक्रार केली आहे.’ अशी माहिती यावेळी बोलताना संदिप देशपांडे यांनी दिली.

तर पुढे बोलताना संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले,
‘एकट्या वैभव थोरात या व्यक्तीने हे काम केले नसून याच्यामागची खरी शक्ती कोण आहे,
हे देखील समोर यायला पाहिजे. आमचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी यासंदर्भात याआधी देखील म्हाडाकडे तक्रार दाखल केली होती.
सरकार त्यांचे होते, त्यामुळे कारवाई झाली नव्हती. आमदारांकडून जर अनाधिकृत बांधकाम केले जात असेल तर,
जनतेने बघायचे कुणाकडे? आमदारकी रद्द करण्यात यावी यासाठी तक्रार करणार असल्याचा इशारा देखील
यावेळी बोलताना संदिप देशपांडे यांनी अनिल परब (Anil Parab) यांना दिला.

 

तर यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील टीका केली.
ते म्हणाले, ‘संजय राऊत यांच्या धमकीला काळं कुत्र देखील घाबरत नाही.
त्यामुळे त्यांच्या धमक्यांमुळे कोणी आमदार गेलं असेल असं मला वाटत नाही.’ असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

 

Web Title :-  Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande complained against yuva sena leaders to ed and eow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू