मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संदीप सातव यांची नेमणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी संदीप सातव यांची नियुक्ती करण्यात आली असून पुणे शहरातही विधानसभा निवडणूक सचिवांच्या नव्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेने संघटनात्मक फेररचना सुरू केल्याचे या नेमणुकांवरून मानले जाते. संदीप सातव यांच्याकडे शिरूर, हवेली, पुरंदर या तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. याखेरीज पुण्यातील सचिवांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत त्यात पुणे शहर निवडणूक यंत्रणा सचिव म्हणून नरेंद्र तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे. विधान सचिव निवडणूक यंत्रणा यांच्याही नेमणुका करण्यात आल्या असून त्यामध्ये हडपसर – गोरख अर्जुन इंगळे, पुणे कँन्टोन्मेंट -भुपेंद्र शेडगे, शिवाजी नगर – विनायक कोतकर, खडकवासला – सुरेश भोसले, कोथरूड – गजेंद्र वेडेपाटील, वडगांव शेरी – राहुल प्रताप, पर्वती – भाऊ मोरे आणि कसबा – वसंत खुटवड अशा नेमणुका करण्यात आल्या आहेत. या नेमणुका एक वर्षासाठी आहेत असे पत्रकात म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0a3e6950-c3fb-11e8-bf57-cd496b7437aa’]

मनसेच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांसह मनसे नेते राजेंद्र वागस्कर, मनसे सचिव वसंत फडके आणि शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B077RTXJ66′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15dbe4cb-c3fb-11e8-a899-c19ebfb8c4bd’]

जाहिरात