Sandeep Varal Murder Case | अपर पोलीस अधीक्षकांची वेतनवाढ रोखली, तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच (Nighoj Former Sarpanch) संदीप वराळ (Sandeep Varal Murder Case) यांचा मागील काही दिवसांपूर्वी खून झाला होता. खून प्रकरणात चुकीचा तपास केल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यालाच शिक्षा झाली आहे. आनंद भोईटे (Anand Bhoite) असे शिक्षा झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. भोईटे हे सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती येथे अपर पोलीस अधीक्षक (Addl SP Baramati) पदावर कार्यरत आहेत. संदीप वराळ यांच्या खूनाच्या प्रकरणाचा (Sandeep Varal Murder Case) तपास भोईटे यांनी केला होता. मात्र, हा तपास चुकीच्या पद्धतीने केल्याचा ठपका ठेवत त्यांना शिक्षा झाली आहे.

 

तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी (Sub Divisional Police Officer) आनंद भोईटे हे सध्या बारामती येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असून त्यांना राज्य शासनाने (State Government) शिक्षा दिली आहे. संदीप वराळ (Sandeep Varal Murder Case) खुनाचा तपास करताना भोईटे यांनी दोन बनावट साक्षीदार दाखवले असल्यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी ज्यांना साक्षीदार करण्यात आले होते त्यातील साक्षीदार अर्जुन गजरे (Arjun Gajre) हे मयत होते तर दुसरे प्रकाश रसाळ (Witness Prakash Rasa) हे घटना घडली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास होते. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत ही बाब समोर आली.

या बनावट साक्षीदारांच्या जबाबावर या गुन्ह्यातील कटाचा आरोप असलेले बबन कवाद (Baban Kawad) व मुख्त्यार इनामदार (Mukhtar Inamdar) यांनी आक्षेप घेतला व राज्य सरकारकडे (State Government) तक्रार केली.
मात्र, सरकारने तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाकडे (Aurangabad Bench) धाव घेतली.
न्यायालयीन सुनावणीत आनंद भोईटे यांना दोषी धरुन त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यास सांगितले.

 

दरम्यान, भोईटे यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) तात्पुरती स्थगिती मिळवली.
गृह विभागाने भोईटे यांची चौकशी करुन ते दोषी असल्याचा अहवाल राज्य सरकारला दिला.
त्यानुसार राज्य सरकारने एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा भोईटे यांना दिली.

 

Web Title :- Sandeep Varal Murder Case | additional superintendent of police anand bhoites salary increase was stopped sandeep varal murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Jalgaon Crime | जळगाव हादरलं! 16 वर्षीय मुलासोबत आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य