सांगली : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणारा फरार आरोपी गजाआड

जत : पोलीसनामा ऑनलाईन

जत तालुक्यातील कोसारी येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या संशयीत आरोपीला जत पोलिसांनी अटक केली. हा प्रकार २५ जुलैला घडला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. निर्भया पथकाने आरोपीचा पाठलाग करुन मंगळवेढा तालुक्यातील तिप्पेहळ्ळी येथे पकडले असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक वर्षा डोंगरे यांनी दिली.

बाबासाहेब मधू करांडे (वय-२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b553023-9a5a-11e8-a71c-37bdeb1ae89a’]

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित अल्पवयीन मुलगी चालत घरी चालली असताना संशयित बाबासाहेब करांडे यांने तिला घरी सोडतो म्हणून त्याच्या दुचाकीवर बसविले. काही अंतरावरील कासलिंगवाडी येथील तलावानजिक निर्जन ठिकाणी त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीने आरडाओरडा केल्याने बाजूच्या शेतात शेळ्या राखणार्‍या अमोल सांगोलकर याला हा प्रकार लक्षात आला. त्याने  संशयित करांडे  याला हुसकावून लावले व पिडीत अल्पवयीन मुलीस वाचविले होते.

दरम्यान, घटना घडल्या दिवसापासून करांडे फरार होता. निर्भया पथकाकडून त्याचा शोध सुरू होता. सोमवारी (दि.६) तो मंगळवेढा तालुक्यातील तिप्पेहळ्ळी येथे नातेवाईकांकडे असल्याची खबर मिळाली होती.  त्याला जेरबंद करून जत पोलिस ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.