सांगली : बारा वर्षापासून फरार असलेल्या अट्टल चोरट्यास अटक

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

तब्बत बारा वर्षापासून फरारी असलेल्या चाेरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला अटक करण्यात यश आले आहे. नंदू रामू जाधव (वय ४५, राय तासगाव) असे अटक करण्यात आलेल्या अाराेपीचे नाव असुन, चाेरी, घरफाेड्या यासारखे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याला तासगाव पाेलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1f99020-a237-11e8-93a7-a57ea076fdcd’]
याबाबत अधिक माहिती,  पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी फरारी असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना नंदू जाधव तासगाव येथे घरी येणार असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्यावर २००६ मध्ये तासगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb01451e-a237-11e8-8e5b-515b1f0ebb68′]

ही कारवाई निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, युवराज पाटील, सतीश आलदर यांच्या पथकाने ही कारवाई केली.