सांगली : शिराळा तालुक्यात दरोडा टाकणारा सराईत अटकेत

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

शिराळा तालुक्यात दोन ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देऊन दरोडा टाकणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. या सहा जणांच्या टोळीने कोयता आणि लोखंडी गजाने जीवे मारण्याची धमकी देऊन दरोडे टाकले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ७९ हजार ५४४ रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’06e2a4ec-c27c-11e8-8317-c38e227329e4′]

धरम उर्फ तडतापडी पितांबर शिंदे उर्फ काळे (वय – ३०, रा. हुबालवाडी, वाळवा, सध्या पुणवंत, शिराळा) असे त्याचे नाव आहे. धरम शिंदे हा गेल्या वर्षभरापासून पसार आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून शिरोळमध्ये खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

अधिक माहिती अशी, की बुधवारी (ता.19) मध्यरात्री पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान शिरशी येथील शासकीय दवाखान्याजवळ सुनंदा शिरसट यांच्या घरात सहा चोरट्यांनी प्रवेश करून लोखंडी गज व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करीत दरोडा टाकला. तीशीतील सहा चोरट्यांनी शिरसट यांच्या घरातील सोन्याचे दागिने व मोबाइल घेवून पलायन केले. चोरट्यांनी लोखंडी गज व कोयत्याने धाक दाखवत घरातील व्यक्तींच्या अंगावर बसून ही लूट केली. मारहाणीत मालुबाई महिंद व अशोक शिरसट हे जखमी झाले. त्यानंतर शिरसाट यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b4f75cc-c27c-11e8-ac30-475ba6e585e0′]

दरोड्यातील चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश अधीक्षक सुहैल शर्मा आणि अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी एलसीबीला दिले. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले. इस्लामपूर विभागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना चोरीतील मुद्देमाल विकण्यासाठी एक तरूण येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. धरम शिंदे हा संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने शिरशी येथे साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दीड तोळ्याचा गोफ, दोन मणी मंगळसुत्र आणि मोबाइल असा ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’111ac38d-c27c-11e8-ad82-9f4fccc80cca’]

सहायक निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक अंतम खाडे, राजू कदम, युवराज पाटील, अशोक डगळे, निलेश कदम, गजानन घरते, सुनील चौधरी, राहूल जाधव, संजय पाटील, उदयकुमार माळी, सागर टिंगरे, चेतन महाजन, अरूण सोकटे, शिराळा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक स्वप्नील घोंगडे, रणजित ठोमके, संजय माने यांचा कारवाईत सहभाग होता.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी