सांगली : तरुणावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

कवठेमहांकाळ येथील तरुणावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घोरपडी फाटा येथे सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल, दुचाकी जप्त करण्यात आली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d0c5f6c4-90f2-11e8-8a4d-2f7e33e409e3′]
मुकुंद ऊर्फ सोन्या दुधाळ (रा. कोंगनोळी) असे गळीबारमध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दिनेश बाळासाहेब राजमाने (वय २२), दत्तात्रय ऊर्फ बंडू मनोहर भुसनूर (वय २३, दोघेही रा. कोंगनोळी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील सोन्या दुधाळ हा मोटरसायकल वरून कवठेमहांकाळहून  कोंगनोळीकडे जात होता. हिंगणगाव जवळील पेट्रोल पंपाजवळ दुधाळ हा थांबला होता. त्यावेळी मोटारसायकलवरून पाठीमागून आलेल्या दोघांनी अगदी जवळून दुधाळ याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये दुधाळ याच्या डोक्यात गोळी घुसून तो जमिनीवर कोसळला. त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराचा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने हालचाली सुरू केल्या. दुधाळ याच्यावर मिरजेच्या मिशन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

यातील संशयितांना पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. दिनेश राजमाने, दत्तात्रय भुसनूर मोटारसायकलवरून पंढरपूर रस्त्याने घोरपडी फाटामार्गे मिरजेकडे जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने घोरपडी फाटा येथे सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सोन्या दुधाळवर गोळीबार केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोटारसायकल (एमएच 04 ईके 4051), दोन हेल्मेट, देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांनाही कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d5907704-90f2-11e8-a205-cfabd279b51b’]

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, सागर पाटील, जितू जाधव, निलेश कदम, अमित परीट, चेतन महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.