Sangli Crime | विभागीय शिक्षण आयुक्तांची मोठी कारवाई ! सांगलीतील लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे निलंबित

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | काही दिवसांपूर्वी सांगली (Sangli Crime) जिल्हा परिषदेच्या (Sangli Zilla Parishad) माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (Vishnu Marutirao Kamble) आणि अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे (Vijaykumar Ashok Sonawane) या दोघांना 3 शिक्षकांकडून 1 लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याबाबत चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोघांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. विभागीय शिक्षण आयुक्त सूरज मांडरे (Divisional Education Commissioner Suraj Mandre) यांनी लाचखोर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षकाला निलंबित केलं आहे.

तीन शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या विभागाच्या पथकानं तेव्हापासून ते 2 मेपर्यंत चौकशी केली. त्यावेळी त्यांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं होतं. शिक्षणाधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे यांना 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Sangli Anti Corruption Bureau) रात्री लाचेच्या रकमेसहीत पकडलं होतं. दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime)

 

दरम्यान, त्यानंतर एसीबी पथकाकडून (ACB Sangli) त्यांच्या घरावर छापे टाकून झडती घेण्यात आली होती. कांबळेच्या घरातून 10 लाख रुपयांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली होती. तर सोनवणेच्या घरात 3 लाखांची रोकड सापडले होते. ही कारवाई केल्यानंतर आता त्यांना थेट निलंबित करण्यात आलं आहे. याबाबत विभागीय शिक्षण आयुक्त सूरज मांडरे यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title :  Sangli Crime | Big action of Divisional Education Commissioner! Sangli’s corrupt education officer Vishnu Kamble and superintendent Vijaykumar Sonawane suspended

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त