Sangli Crime News | सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी एका सहकारी संस्थेच्या संचालकासह सचिवावर गुन्हा दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime News | मिरज तालुका येथील कसबे डिग्रज येथे सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी एका सहकारी संस्थेच्या संचालकासह सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारकडून मिळालेल्या 60 लाखाच्या निधीत अफरातफर करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप पर्ल फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मागासवर्गीय सहकारी संस्थेच्या संचालकासह सचिवावर करण्यात आला आहे. याबाबत संचालक आयुब बाबासाहेब मोमीन (वय 50 राहणार गवळी गल्ली सांगली) आणि सचिव कुमार रघुनाथ पाल (रा. सांगली) अशा दोन संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Sangli Crime News)

 

या संपूर्ण प्रकरणी लेखापरीक्षक प्रदीप विजय काळे यांनी 1 मार्चला फिर्याद दिली आहे. 2012 मध्ये सरकारने मागासवर्गीय व गरीब लोकांनी रोजगार उभा करावा यासाठी काही योजना जाहीर केल्या होत्या. त्याच अंतर्गत कसबे डिग्रज येथे पर्ल फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मागासवर्गीय सहकारी संस्थेला सरकारकडून एक कोटी रुपये मिळाले होते. यावेळी संशयित आरोपी आयुब मोमीन आणि सचिव कुमार पाल हे काम पाहत होते. (Sangli Crime News)

या दोन्ही संशयतांनी संगनमत करून डिसेंबर 2012 ते जुलै 2022 या कालावधीमध्ये संस्थेची स्कॉलर हाऊसची निर्मिती करणे, स्टॉलर झालेले बीफ व इतर फळ फुले त्याच पद्धतीने इतर उत्पन्न हे खरेदी करून पॅकिंग करणे आणि मार्केटिंग करण्यासह उत्पादन करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी प्राप्त व्हावे म्हणून प्रस्ताव सादर केला होता.
त्या प्रस्तावा अंतर्गत 59 लाख 78 हजार 572 रुपयांची निधी संस्थेला प्राप्त झाला होता.
या संशयित दोघांनी या निधीत अफरातफर करून स्वतःच्या फायद्यासाठी काही रक्कम काढून घेतल्याचे समोर आले.
यावरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Sangli Crime News | A case has been registered against the director and secretary of a cooperative society for defrauding the government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ayan Mukerji | ‘ब्रह्मास्त्र 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ; दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली मोठी हिंट

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”