Sangli Lok Sabha | सांगलीत मोठा ट्विस्ट, काँग्रेसमध्ये बंड होणार? प्रकाश आंबेडकर स्पष्ट म्हणाले, ”प्रतीक पाटील भेटून गेले, त्यांना निवडून आणू”

सांगली : Sangli Lok Sabha | ठाकरे गट (Shivsena UBT) आणि काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यातील सांगलीच्या उमेदवारी वरून सुरू असलेल्या वादातून सांगलीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विशाल पाटील बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगलीच्या या वादावर जाहीर वक्तव्य केल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे.

उमरेड (Umarkhed) येथील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, काँग्रेसमध्ये (Congress) लढण्याची ताकद नसल्यामुळे त्यांनी ठाकरे गटा समोर नांगी टाकली आहे. सांगलीत ठाकरे गटाची उभे राहण्याची ताकद नसून काँग्रेसची ताकद आहे. प्रतीक पाटील (Pratik Patil) भेटून गेले. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि निवडून आणू अशी ग्वाही देतो. आंबेडकर यांच्या याच वक्तव्यामुळे विशाल पाटील बंडखोरी करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

प्रकाश आबेडकर म्हणाले, काँग्रेस म्हणते, आम्हाला संविधान वाचवण्यासाठी मत द्या. मग वंचितला दोनच जागा का देत होतात?. आमचा लढा उभारू असे म्हटले तेव्हा दोन घ्या, दहा घ्या म्हणत होते. खरे म्हणजे यांना दोन पेक्षा जास्त जागा द्यायच्या नव्हत्या. त्यांची मॅच फिक्सिंग झालेली दिसते. त्यातून आपली चौकशी बंद करायची असा तर डाव नव्हता ना?

(Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) अनेक ठिकाणी मॅच फिक्सिंग झाली आहे, असा मी आरोप करत आहे. रामटेकमधील (Ramtek Lok Sabha) काँग्रेस उमेदवाराचे कास्ट सर्टिफिकेट टिकणार नाही हे सर्वांना माहीत होते. तरीही जबरदस्तीने उमेदवारी दिली. ऐनवेळी उमेदवारी रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वे यांच्या पतीला उमेदवारी जाहीर केली.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, नाना पाटोले (Nana Patole) यांना उमेदवारी जाहीर झाली. पण त्यांनी लढण्यास नकार दिला. का? नांदेडमध्ये जो उमेदवार दिला तो आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवर असतो. तो प्रचार करेल की तब्येत सांभाळेल. अशी अनेक उदाहरणे मी देऊ शकतो.

आंबेडकर म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये (Kalyan Lok Sabha ) शिवसेनेकडून उमेदवार दिला. पण एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) मुलाविरोधात तो उमेदवार लढूच शकत नाही असे कल्याणचेच लोक म्हणत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा?

तुषार गांधीं (Tushar Gandhi) यांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी अनेक नावे घेऊ शकतो की, जे म्हणत आहेत हे उभे कसे राहिले? आम्ही पक्ष म्हणून उभे राहिलो आहोत. तुम्हाला वाटत असेल की, भाजप (BJP) हरली पाहिजे, तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडावे. भाजपसोबत दोन हात करून आम्ही मोकळे होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही.

आम्ही मोदीची (PM Narendra Modi) ताकद उखडून टाकायला निघालो आहोत. आम्ही त्यांना उघडे पाडत आहोत. जे तुम्ही करायला पाहिजे ते आम्ही करत आहोत, म्हणून शाम मानव (Shyam Manav) आणि तुषार गांधी यांना मिरच्या झोंबायला लागल्या आहेत, असा घणाघात आंबेडकरांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | इतिहासाची मोडतोड करून पंडीत नेहरूंच्या परराष्ट्र धोरणांवर टीका करणार्‍या भाजप नेतृत्वाने चीन गिळंकृत करत असलेले ‘भोलेनाथा’चे कैलास वाचवावे