सांगलीत धूम स्टाईल ने मोबाईल चोरणाऱ्यांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात दुचाकीवरून धूमस्टाईलने मोबाईल चोरून पसार होणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले. दरम्यान यातील दोन संशयित पसार झाले आहेत. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली.

रजाअली शाबानअली राजनी (वय 26) आणि जॉर्डन युसुफ इराणी (25, रा. खोजा कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील रजाअली राजनी याचे पटेल चौकात “ए टू झेड’ मोबाईल दुकान असून तो चोरलेले मोबाईलची विक्री करत असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून धूम स्टाईलने मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.

शहरातील आप्पासाहेब पाटील नगर परिसरात रस्त्याने निघालेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसडा मारुन पळविण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले होते. पटेल चौकातील “ए टू झेड’ मोबाईल शॉपी’चा चालक चोरीचे मोबाईल विकत घेत असल्याची माहिती सिंदकर यााना मिळाली. त्यानुसार या मोबाईल शॉपीचा मालक रजाअली यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने चोरीचे मोबाईल खरेदी विक्री करत असल्याची कबुली दिली. तसेच खोजा कॉलनीतील जॉर्डन इराणी, महमंद इराणी आणि यासीन इराणी यांच्याकडून मोबाईल घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/