सांगली  : पोलिसांच्या त्या ‘अर्थपूर्ण’ चौकशीची वरिष्ठांकडून दखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर एका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघा संशयितांना ‘अर्थपूर्ण’ चौकशी करुन मुद्देमालासह पोलीसांनी सोडून दिल्याचा आरोप आहे. पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

औद्योगिक कारणासाठी प्रसिध्द असलेल्या जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशन हद्दीत नुकतीच घडलेली ही घटना. वेगळी ‘रचना’ असलेल्या एका बारमध्ये दोन परप्रांतीय दारु पिण्यासाठी दुपारी आले होते. त्यांच्या सोबत असलेली बॅग त्यांनी टेबलवर ठेवली. त्या बॅगेमध्ये नोटा होत्या. या नोटा बनावट असल्याच्या व त्या नोटा खपविण्याच्या उद्देशाने ते परप्रांतीय सांगलीत आल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन व हालचालीवरुन बारमधील वेटरच्या लक्षात आले. त्या वेटरने हॉटेल मालकाला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधीत हॉटेल मालकांनी एका पोलीसाला फोन लावला  व बनावट नोटा व त्या व्यक्तींबद्दल माहिती दिली.

[amazon_link asins=’B019QEA064,B01AC1HR84′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f559216-8206-11e8-80bd-4769ad788315′]

संबंधीत पोलीस ठाण्यातील दोन कॉन्स्टेबल हॉटेलमध्ये आले. प्राथमिक चौकशीत त्या दोघांना संशय आल्याने त्यांनी त्या परप्रांतीयांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले.  दुपारच्या वेळ असल्याने पोलीस ठाण्यात पोलीसांची संख्या कमी होती. याचा गैरफायदा घेऊन त्या दोन पोलीसांनी परप्रांतीयांना पोलीसी खाक्या दाखविताच त्या बनावट नोटा खपविण्यासाठी सांगलीत आल्याचे कबूल केले. तसेच या गुन्ह्यामध्ये सामील असणार्‍यांची माहिती दिली.

दरम्यानच्या काळात ही घटना संबंधीत परप्रांतीयांच्या गॉडफादरला कळाली. त्यांने जोरदार फिल्डींग लावून दोन पोलीसांशी संपर्क साधला. पोलीसांनी देखील ‘अर्थपूर्ण’ सखोल चौकशीस करुन आरोपात तथ्य नसल्याचे समजून हे प्रकरण फाईल बंद केले व त्या दोघांना सोडून दिले.

या घटनेचे वृत्त शहरात पसरताच सर्वत्र एकच चर्चा सुरु होती.  ते दोन पोलीस कोण? असा प्रश्‍न चर्चेत होता. याप्रकरणाची जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दखल घेतली व स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना चौकशीचे आदेश दिले. श्रीकांत पिंगळे यांनी त्या पोलीसांचे जबाब नोंदविले असून. सीसीटीव्ही फुटेज मिळविले आहेत. तसेच त्या दोन संशयित परप्रांतीयांचे पत्ते मिळवून त्यांना ताब्यात घेवून सखोल चौकशी करण्याची शक्यता आहे.