सांगलीः बसस्थानक परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन

शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या ममता लाॅजवर सेक्स रॅकेट सक्रिय असल्याचे पोलीस कारवाईत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांना लाॅज मालकासह एजंटला देखील अटक केली असून, हाॅटेल मालक संदेश वसंत कल्याणकर (वय-42, रा. हरिपूर रस्ता, सांगली), एजंट भूपाल भुजाप्पा मगदूम (रा. सीतारामनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता लाॅजवर वेश्या व्यावसाय चालू असून, त्यासाठी लाॅजवर मुलींना ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र शेळके यांच्या पथकाने लाॅज परिसरात लक्ष ठेवले. बनावट ग्राहक तयार करुन एका व्यक्तीला लाॅजमध्ये पाठवण्यात आले. त्यावेळी लाॅजमध्ये वेश्या व्यावसाय चालत असल्याचे समोर आले. पोलिसांनी लाॅजवर छापा टाकून, त्या ठिकाणी असलेल्या एका महिलेची सुटका केली.

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिल्पा यमगेकर, भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, अभिजीत गायकवाड, स्नेहल मोरे यांनी केली.