सांगवी : आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या इसमाला अटक

सांगवी : पोलीसनामा ऑनलाईन

आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या ५५ वर्षीच्या एका नागरिकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि.८) दोनच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

शिवकुमार बंडप्पा नवाखंडे (वय-५५ रा. लोंढे वस्ती, ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
[amazon_link asins=’B07944CZ7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c3707bc-8463-11e8-87c5-01e0c4723fe7′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोसायटीच्या बिल्डींगमध्ये खेळत होती. आरोपीने मुलीला बोलावून घेऊन तीच्यासोबत अश्लिल चाळे केले. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पोलिसांनी आरोपी शिवकुमार याचेवर पास्को कायद्याअंतर्गत गन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.