Sanjay Raut ED Raid | पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना अखेर ईडीने घेतले ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut ED Raid | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) ईडीचे पथक (ED) संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी घराची झाडाझडती आणि चौकशी करुन नऊ तासांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.

 

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीचे 8 – 10 अधिकारी पोहोचले. राऊत आणि त्यांच्या पत्नी यांची चौकशी करण्यात आली. राऊतांच्या घराबाहेर पोलिसांसह (Mumbai Police) सीआरपीएफचा (CRPF) फौजफाटा हळहळू वाढवण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते देखील जमू लागले होते. त्यानंतर साडेनऊ तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.

 

ईडी अधिकाऱ्यांकडून राऊतांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया दुपारी 3 च्या सुमारास सुरु झाली.
त्यानंतर 3.50 वाजता संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले.
आता ईडीचे अधिकारी बॅलार्ड पिअर (Ballard Pier) येथील कार्यालयात घेऊन जाणार आहेत.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी रविवारी सकाळी सात वाजता ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरावर छापेमारी केली.

 

Web Title : – Sanjay Raut ED Raid | finally sanjay raut detains by ed in the patra chawl scam case mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा