Sanjay Raut on Supriya Sule | ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे’ ! सुप्रिया सुळेंच्या विधानावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले – ‘पुढील 25 वर्षे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut on Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी नुकतेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक सूचक विधान केलं. राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढतेय. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

संजय राऊत बोलताना म्हणाले, ”महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीपदावरून काहीजण संभ्रम निर्माण केले जात आहेत. पण पुढील 25 वर्षे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच मुख्यमंत्री राहतील.’ सध्या उद्धव ठाकरे हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi Government) नेतृत्त्व करत आहेत. शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), अजितदादा (Ajit Dada), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर खुश आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न निर्माण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे.” असं ते म्हणाले.

 

पुढे संजय राऊत म्हणाले, ”सध्या उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
सुप्रिया सुळे यांनी स्वत:ही पुढची 25 वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असे म्हटले होते.
त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून निर्माण करण्यात येणाऱ्या संभ्रमांकडे दुर्लक्ष करा,” असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sanjay Raut on Supriya Sule | shivsena leader and MP sanjay raut hits back ncp supriya sule comment about cm post of uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा