Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील खूनाचे सत्र थांबेना; गुन्हेगाराचा निर्घृण खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |खूनाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणावर कोयत्याने तोंडावर व डोक्यावर वार करुन निर्घृण खून (Murder In Hadapsar Of Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगेश किशोर शिंगाडे Mangesh Kishor Shingade (वय २६, रा. कुमार शिंगाडे कॉलनी, पापडेवस्ती, भेकराईनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे (Pune Crime).

याप्रकरणी राजू विष्णु शिंगाडे (वय ५३, रा. पापडेवस्ती) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना फुरसुंगी (Fursungi)
येथील भेकराई बस डेपो (Bhekrai Nagar Bus Depot) शेजारील श्री मल्टी पर्पज हॉलच्या समोर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश शिंगाडे याच्याविरुद्ध २०१६ मध्ये एक गुन्हा दाखल होता (Pune Criminals). अकस्मात मृत्युवर त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगेश शिंगार्डे हा काल सायंकाळी फुरसुंगी येथील भेकराई बस डेपोशेजारील श्री मल्टी पर्पज हॉलच्या समोर असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला केला. त्याच्या तोंडावर व डोक्यावर सपासप वार करुन त्याचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात मंगेश तेथे पडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. खूनामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Murder Of Mangesh Shingade Near Bhekrai Nagar Bus Depot Of Fursungi Hadapsar Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त