Sanjay Raut | संजय राऊतांची सरकारवर जहरी टीका म्हणाले; ‘हा अपमान सहन करणारी तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अगदी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यातच नुकतच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते परत एकदा अडचणीत सापडले आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी शब्दात करताना दिसत आहेत. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) आता सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. (Sanjay Raut)

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी शब्दात केला आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यावरून महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजपवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘आम्ही पूर्वीपासूनच या मुद्यावर लढतच आहोत. मात्र जे सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? आम्हाला असं वाटत केंद्रातला एखादा मंत्री तरी या विषयावर राजीनामा देऊन महाराष्ट्रात परत येईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महापुरूषांचा जो हा अपमान सहन करत आहेत ते गांXXची अवलाद आहेत असा घणाघात सत्ताधारी पक्षावर केला.

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर देखील हल्लाबोल केला.
औरंगजेबाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेब ‘जी’ असा केला आहे.
त्यावरून त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाना साधला.
ते म्हणाले, बीकेसीच्या सभेमध्ये मी औरंगजेबाचं गुजरात कनेक्शन सांगितलं होतं.
औरंगजेबाचा बाप हा गुजरातचा सुभेदार होता. त्यामुळेच भाजप नेते औरंगजेबाला औरंगजेबजी असं बोलतात.
असा खोचक टोला संजय राऊतांनी (Sanjay Raut) बावनकुळेंना लगावला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut criticizes bjp and governor bhagat singh koshyari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक